Sunday, April 6, 2025
spot_img
38.3 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeblogमुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा - अविनाश म्हस्के

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा – अविनाश म्हस्के

कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे तालुका युवा मोर्चा चिटणीस अविनाश म्हस्के यांनी केले आहे
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्याबाबतच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याकरिता आपल्या राज्य शासनाच्या मान्यतेने सहमतीने अ ३१ डिसेबर २०२३ रोजी ज्या व्यक्तीचे वय ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/उपकरणे पुरविण्याची वयोश्री योजना सुरु केली आहे.
लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टीक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबा बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पोर्टल कार्यान्वीत होईपर्यंत या योजनेअंतर्गत निधीची वितरण पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँकेच्या बचत खात्यात एकवेळ एकरकमी रक्कम रुपये (३०००/- तीन हजार) शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-
१) आधार कार्ड / मतदान कार्ड
२) राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स प्रत
३) पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
४) स्वयं घोषणापत्र
५) शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
पात्र झालेल्या लाभार्थ्यांकरिता DBT Portel द्वारे डायरेक्ट लाभार्थ्याच्या दिलेल्या बँक खात्यामध्ये रु. रक्कम प्रति लाभार्थी (३०००/- तीन हजार) प्रमाणे जमा होतील.
तरी शहरातील ६५ वर्षे वयाचे पुढील वय असणाऱ्या नागरिकांनी आपले अर्ज मदत केंद्रांवर जमा करावेत. त्यासाठी सर्व केंद्रांवर फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत व तेथे जमा करावयाचे आहेत.मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा गावातील गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा तालुका युवा मोर्चा चिटणीस अविनाश म्हस्के. यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular