Sunday, April 6, 2025
spot_img
38.3 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeblogभीषण अपघात : महिलेच्या दोन्ही पाय चिरडले गेले

भीषण अपघात : महिलेच्या दोन्ही पाय चिरडले गेले

लोकशक्ती न्यूज | नितीन ठाकूर

शहरातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच किराणा घेवून घराकडे परतणाऱ्या ललिता प्रकाश सोनवणे (वय ४७, रा. तांबापुर) या महिलेला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात महिलेच्या दोन्ही पायांचा चुराडा होवून त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना रविवार दि. २० रोजी दुपारच्या सुमारास ईच्छादेवी चौकात घडली. महिलेवर अतिदक्षता विभागात सुरू आहे. एमआयडीसी पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरात राहणाऱ्या ललिता या रविवारी दुपारच्या सुमारास किराणा साहित्य घेऊन घरी जात होत्या. दरम्यान, आकाशवाणी चौकाकडून अजिंठा चौफुलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने इच्छादेवी चौकातील सर्कलजवळ त्यांना जोरदार धडक दिली. यात ट्रकच्या पुढील चाकाखाली महिलेचे दोन्ही पाय आल्याने त्यांचा अक्षरशः चुराडा होऊन ते निकामी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर महिलेचे नातेवाईक विवेकानंद बागूल व अन्य नागरिकांनी जखमी अवस्थेत महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.ललिता सोनवणे या एक सुपरशॉपमध्ये कामाला असून त्यांचे पती अंपग असून सासू आजार आहे. त्यामुळे संपुर्ण कुटुंबार्च जबाबदारी ही ललिता सोनवणे यांच्यावरच आहे.

अपघातात महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले होते. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेच्या पायांची स्थिती बघितली असता, त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र ललित सोनवणे यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने लाखोंचा खच्च करणे शक्य नसल्याने या महिलेव ‘जीएमसी’ तीलच आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular