Monday, April 7, 2025
spot_img
36.9 C
Delhi
Monday, April 7, 2025
spot_img
Homeblogजिनिंग व्यावसायिकाची तब्बल ८६ लाख रुपयात फसवणूक

जिनिंग व्यावसायिकाची तब्बल ८६ लाख रुपयात फसवणूक

लोकशाक्ती न्यूज l नितीन ठाकूर

जळगाव : धरणगाव येथील एका जिनिंग व्यावसायिकाची तब्बल ८६ लाख ९६ हजार ७७८ रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव येथील वल्लभ जिनिंगचे मालक हरीश सुभाष अग्रवाल (वय ४७), यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २४ ऑगस्ट २०२२ ते २० मार्च २०२४ च्या दरम्यान ब्रोकर भावेश शहा (रा. कोईम्बतूर (तामीलनाडु), रंजीता इंटरप्रायझेस रायचूरचे मालक भाव्या नायक आणि पायोनियर इंटरप्रायझेस रायचूरचे मालक बबीता संचेती यांनी सर्वांनी संगनमताने आपला विश्वास संपादन केला. त्यानंतर २६ ऑगस्ट २०२२ रोजी पाठवलेले ११० रूई गठाण व दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी पाठवलेले १०० रूई गठाण असा माल घेवुन एकुण ८६ लाख ९६ हजार ७७८ रुपयांची फसवणूक केली. वारंवार पैशांची मागणी करून देखील पैसे न मिळाल्याने श्री. अग्रवाल यांनी धरणगाव पोलिसात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले हे करीत असून सदरचा गुन्हा आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची तजवीज देखील पोलिसांनी ठेवली आहे. दरम्यान, तक्रारदार यांनी माल पाठवले बाबतची बिले, तसेच तक्रारदाराने ज्या गाडीत माल पाठवला त्याचे फोटो, माल पाठवाल्याचे इ-मेलची प्रत, गाडीत माल भरून पाठवलेचे वजन काटा पावत्या इतर कागदपत्र पोलिसांना सादर केली आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular