लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
जळगाव : शहरातील प्रतापनगरात असलेल्या केंद्राचे असलेल्या अतिक्रमणाच्या विषयासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका अर्जदारांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून मागे घेतली. न्यायालयाने या विषयीची विनंती मान्य केल्यानंतर ही याचिका निकाली निघाली असल्याची माहिती अॅड. सुशील अत्रे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रतापनगर परिसरात असलेल्या केंद्राच्या अतिक्रमणाविषयी परिसरातील नागरिकांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार हे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावरून शुक्रवारी रात्री या परिसरातील रहिवासी अॅड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. रविवारी दि. २० ऑक्टोबर रोजी आकाशवाणी चौकात सेवेकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी दुसरीकडे या विषयासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेली अवमान याचिका मागे घेण्याची ग्वाही प्रतापनगर परिसरातील रहिवाशांच्यावतीने अॅड. सुशील अत्रे यांनी दिली होती. त्यानुसार सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी खंडपीठात अॅड. अत्रे यांनी रहिवाशांच्यावतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून याचिका मागे घेतली. त्यामुळे आता अवमान याचिका निकाली निघाली असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रातील सेवेकऱ्यांनी अॅड. अत्रे यांना भेटून विनंती केली होती. मात्र त्यांनी तक्रार मागे न घेतल्याने केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. हा निर्णय यापुर्वी घेतला असता तर मनःस्ताप टळला असता, असे केंद्राचे अध्यक्ष बी.एन. पाटील यांनी सांगितले.