Monday, April 7, 2025
spot_img
36.9 C
Delhi
Monday, April 7, 2025
spot_img
Homeblogकारागृहात तरुणाला मारहाण प्रकरण भोवले, उपअधीक्षकाचा पदभार काढला!

कारागृहात तरुणाला मारहाण प्रकरण भोवले, उपअधीक्षकाचा पदभार काढला!

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात दाखल असलेल्या ज्ञानेश्वर अभिमान पाटील (वय ५५, रा. वाघळी, ता. चाळीसगाव) या बंद्याला मारहाण प्रकरणाची विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी गंभीर दखल घेतली असून प्रभारी उपअधीक्षक गजानन पाटील यांच्याकडील पद‌भार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याजागी नाशिक कारागृहाचे उपअधीक्षक सचिन चिकने यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

नेमकी प्रकरण काय?
खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या ज्ञानेश्वर पाटील याला कारागृहातील हिवरकर नामक कर्मचारी व अन्य जणांनी १५ ऑक्टोबर रोजी बेदम मारहाण केली होती. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या मारहाणीची दखल घेत उपअधीक्षक गजानन पाटील यांच्याकडील पदभार तडकाफडकी काढून घेतला आहे.

दोन दिवसांत अहवाल मागवला या प्रकरणात जखमी पाटील यांच्यासह मारहाण करणारा हिवरकरसह अन्य कर्मचारी व उपअधीक्षक गजानन पाटील यांचाही जबाब घेण्यात आला आहे. त्याशिवाय सीसीटीव्ही फुटेज, उपचाराचे कागदपत्र मिळविण्यात आले आहे. दोन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होईल. या प्रकरणात कारवाई होणारच असल्याचे डॉ. सुपेकर यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular