
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
जळगाव :- हे देणारे सरकारआहे. कोणी माई का लाल आला तरी हि लाडकी बहीण योजना हा एकनाथ शिंदे बंद होऊ देणार नाही. तुम्ही आशीर्वाद दिला तर आणखी पैसे वाढवू अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथील सभेत सांगितले.
लाडक्या बहिणींना आचारसंहिता संपल्यावर डिसेम्बरचे पैसे मिळणार आहे. हि योजना कायम लागू राहणार आहे. योजना बंद होणार नाही. कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती होताना बघायचे आहे. विरोधकांच्या पोटात दुखत आहे. विविध याचिका कोर्टात टाकल्या जात आहे. मात्र या याचिका कोर्टात टिकणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुलींना १०० टक्के फी माफ करणारे हे पहिले सरकार आहे. मुलींच्या शिक्षणाचे पैसे आता सरकार देणार आहे.