Sunday, April 6, 2025
spot_img
38.3 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeblogमूहर्त ठरला मंत्री गुलाबराव पाटील आज भरणार उमेदवारी अर्ज ; यांच्या समर्थनात...

मूहर्त ठरला मंत्री गुलाबराव पाटील आज भरणार उमेदवारी अर्ज ; यांच्या समर्थनात एकवटली पाळधी नगरी…!

नितीन ठाकूर l जळगाव

जळगाव ग्रामीण मतदार संघाचे शिवसेना उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील हे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या अनुषंगाने पाळधी येथे जि.प सदस्य प्रतापराव पाटील तसेच युवा नेते विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ना.गुलाबराव पाटील यांच्या सामाजिक बांधिलकी, सर्व समाजाला न्याय देण्याहेतू सुरु असलेले अथक प्रयत्न, सामान्यांप्रती असलेली आपुलकी, सामान्य कार्यकर्त्यांची जाण, व सर्व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा झंजावत लक्षात घेत सदर रॅलीला पाळधीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रसंगी रॅली मध्ये माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे,माझी सभापती सचिन पवार,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद मानकरी यांचसह दोघी गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व सामाजिक संघटनांचे अध्यक्ष महायुतीचे सर्व पदाधिकाऱ्यां समवेत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर रॅलीच्या सुरुवात पाळधी खुर्द येथील भवानी माता मंदिर येथे श्रीफळ सोडून करण्यात आली तिथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. सदर यायला त्या ठिकाणी भवानी प्लॉट महात्मा फुले नगर परिसरात तेथून श्याम कॉलनी, बस स्टॅन्ड मागील परिसर माळीवाडा, भजी गल्ली, शनीनगर, बौद्ध वाडा,भोई वाडा, साठघर मोहल्ला, मोठी पाळधी माळीवाडा, धनगर वाडा महाराणा प्रताप चौक मातंग वाडा कोळीवाडा त्यातून पाटील वाडा मारवाडी गल्ली तेथून शिवसेना प्रचार कार्यालय येथे सदर रॅलीची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular