Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogवक्फ बोर्ड कायदा रद्द करणार -अमित शहा ; तर मुस्लिमांना दहा टक्के...

वक्फ बोर्ड कायदा रद्द करणार -अमित शहा ; तर मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देणे अशक्य

लोकशक्ती न्यूज | नितीन ठाकूर

महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार महायुती सरकारने खूप चांगले काम केले असून विकासाची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी पुन्हा महायुती सरकारला विजयी करा असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी फैजपुर ता. यावल येथे केले.महायुतीचे रावेर मतदार सघाचे उमेदवार अमोल जावळे, भुसावळचे उमेदवार संजय सावकारे, चोपड्याचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगरचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत शहा बोलत होते. तत्पूर्वी सभेला केंद्रीय क्रीडा युवा कल्याण मंत्री रक्षा खडसे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उमेदवार अमोल जावळे, संजय सावकारे, डॉ. कुंदन फेगडे आदींनी संबोधित केले. अमित शहा यांनी व्यासपीठावर येताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले आणि थेट भाषणाला सुरुवात केली. अमित शहा म्हणाले मला सांगा कश्मीर हा आपला भाग आहे किंवा नाही. 370 कलम हटवणे आवश्यक होते किंवा नाही असा प्रश्न श्रोत्यांना विचारला आणि हे काम एनडीएसरकारने केले आहे. तर सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवला आहे. पण विरोधक यांना देशाच्या सुरक्षेचे काहीहीपडलेले नाही. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि आमच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांतविचार आणि संस्कृतीची रक्षा केली आहे. गरिबांना घरे, मोफत धान्य, लाडकी बहीण योजना, आदी. कल्याणकारी योजनाराबवल्या. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा निवडून द्या लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये महिना केलाजाईल. महाराष्ट्र मध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी यांची भक्कम अशी महायुती आहे .पुढे बोलताना ते म्हटले वक्फ बोर्ड कायदा रद्द करायचा असून मुस्लिम समाज ला 10% आरक्षण द्यायचं म्हटलं तर ओबीसी दलित आदिवासी यांचे आरक्षण कमी करून देणे शक्य नाही. परंतु विरोधक हे सत्तेसाठी अंधे बनले आहेत. महाराष्ट्र मध्ये पुन्हा महायुती सरकार आल्यानंतर 25 लाख नोकऱ्या, दहा लाखविद्यार्थ्यांना ट्युशन फी देणे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना रुपये 15000 दिले जाईल. काँग्रेसच्या काळात महाराष्ट्र गुंतवणूकआणि विकासाच्या बाबतीत नंबर चार होता तर आता नंबर एक वर आहे. स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी या भागाचा विकास करण्याचाप्रामाणिक प्रयत्न केला आहे तर आता त्यांचे सुपुत्र अमोल जावळे ह उमेदवार असून त्यांना साथ द्या विजयी करा आणि शहा यांनी यावेळी माजी खासदार स्वर्गीय गुणवंतराव सरोदे, माजी मंत्री स्वर्गीय जे.टी महाजन यांचे स्मरण केले आणि महाराष्ट्रात विकासाचीपरंपरा कायम ठेवण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी केले. केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे म्हणाल्या ज्या पद्धतीने आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आघाडी देऊन मला प्रचंड मतांनी निवडून दिले त्याचप्रमाणे आताही महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले, तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले जळगाव जिल्हा हा भाजप आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे गेल्यावेळी फक्त एकमेव रावेरची आपली जागा थोड्या मतांनी गेली होती. पण आता रावेर सह जिल्ह्यातील सर्व अकरा जागा महायुतीच्या निवडून येतील असा आत्मविश्वास आहे. व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, अर्चना चिटणीस, बन्सी लालजी गुजर, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, राजेंद्र फडके, खासदार स्मिता वाघ, जळके महाराज, रावे चे उमेदवार अमोल जावळे, भुसावळचे उमेदवार संजय सावकारे, मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, चोपड्याचे चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, अशोक कांडेलकर, नंदकिशोर महाजन, अजय भोळे, डॉ. केतकी पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. कुंदन फेगडे, हिराभाऊ चौधरी, विलास चौधरी, भरत महाजन, उमेश फेगडे आदी उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular