Saturday, April 5, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogबाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार !" - गुलाबराव...

बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार !” – गुलाबराव पाटील यांना विश्वास

लोकशक्ती न्यूज | नितीन ठाकूर

जळगाव / धरणगाव, १४ नोव्हेंबर – ममुराबाद, मोहाडी, दोनगाव, आव्हाणी, फुलपाट, धानोरा, टाकळी या भागात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी धनुष्यबाणाचा सळसळता जल्लोष पाहायला मिळाला आहे. माध्यमांशी संवाद साधताना, पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत सांगितले की, “होय, हा सामान्य टपरीवालाच बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात चौथ्यांदा प्रवेश करणार आहे.” आपण गावोगावी रस्ते, मुलभूत सुविधा देवून आणि पूल बांधले आणि गावं जोडण्याचे काम करून जनतेच्या सुखं आणि दु:खात जावून माणस जोडण्याचे काम केल आहे. मोहाडी पासून ममुराबादपर्यंत जल्लोषात प्रचार ! ममुराबाद येथे खंडेराव महाराज मंदिरासाठी ३ कोटींच्या निधीतून सुधारणा, या भागातील विविध गावांत रस्ते, पूल, स्मशानभूमी, ट्रांसफार्मर आणि शेतकरी शेती रस्ते, नवी ग्रामपंचायत भवन बांधून लेंडी नाला, पिंप्राळा रोड, कानळदा रस्ता व लवकी नाल्यावर चार पूल केल्याने तसेच मुस्लिम वस्तीत कब्रस्तान संरक्षक भिंत , शादी खाना उर्दू शाळेपर्यंतचे रस्ता, बौद्ध विहा,र गावअंतर्गत सोयी सुविधा, कंपाउंडसह आधुनिक स्मशानभूमी, शेतकऱ्यांसाठी ट्रांसफार्मर, दोनगाव पासून शेरी, कानळदा, पथराड, खेडी हे शिव व शेतीचे रस्तेदर्जोन्नात करून डांबरीकरण अश्या विविध सुविधा केल्याबद्दल ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी गुलाबराव पाटलांचे रांगोळ्या काढून, फटाक्यांच्या आतषबाजीत व पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत केले. मोहाडी येथे घोड्यावरून, ममुराबादमध्ये ओपन जिपमधून आणि इतर भागात पायी रॅली काढून त्यांनी आपला प्रचार केला. विविध समाजांनी पाठिंबा देत पाटील यांना सन्मानित केले, तर ममुराबाद येथील शेतकऱ्यांनी धनुष्यबाणाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे आश्वस्त केले.

यांची होती उपस्थिती – जिल्हा प्रमुख निलेश पाटील, संजय पाटील सर, डी.ओ. पाटील, शिवराज पाटील, जि.प. सदस्य पवन सोनवणे, जनाआप्पा कोळी, अनिल भोळे, तुषार महाजन, ममुराबाद- महेश चौधरी, सरपंच हेमंत चौधरी, शैलेंद्र पाटील, भरत शिंदे, अमर पाटील, राहुल ढाके, संतोष कोळी, निखिल पाटील, सचिन पाटील, विकास शिंदे, विलास सोनवणे, नासीर पटेल, अनिस पटेल, ईजाज पटेल, मोहाडी – सरपंच डंपी सोनवणे, भगवान पाटील, योगेश बाविस्कर , राहुल पाटील, भरत सोनवणे, निंबा गवळी, किरणकेरू गवळी, वाल्मीक गवळी, राजू गवळी, युवराज निरखे , धानोरा – भुषण पाटील, गणेश पाटील, नाना पाटील, दोणगाव बुद्रुक व खुर्द किशोर पाटील, सरपंच भागवत पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, वासुदेव पाटील, सुभाष पाटील, ज्योतिताई शिवदे, पुष्पाताई पाटील, आव्हानी – सदाशिव पाटील, सचिन पाटील, तुषार पाटील, फुलपाट- हरिभाऊ पाटील, भिमसिंग पाटील, किरण पाटील, टहाकळी – जितू चव्हाण, मधुकर पाटील, सुनील पाटील यांच्यासह त्या-त्या गावातील ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular