लोकशक्ती न्यूज नितीन ठाकुर
पाळधी :- महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील प्रचार सभेत बोलतांना ते म्हणाले मी माझ्या उभ्या आयुष्यात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे मी कुठेही जात-पात पाहून निधी वाटला नाही विरोधकांनी त्यांची पातळी सोडली काही ही बोलतात. त्यानंतर त्यांनी विकासकामांची यादी मांडत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. ते पुढे म्हणाले आचार संहिता लागल्या मुळे जी काम रखडली आहेत ते पुर्ण करायची आहे “मी चौथी निवडणूक लढतोय. विकासावर बोलायला विरोधकांची हिंमत होत नाही. मी नेहमी सर्वसामान्य व गरिबांच्या पाठीशी उभा राहिलोय. गिरणा नदीवर बंधारा बांधून दाखवणारच हे माझं पुढचं व्हिजन आहे . यावेळी बोलतांना ते म्हणाले, ही लढाई माझी नसून गावाची लढाई आहे. मी गावाला अजून एकच विनंती करणार आहे की, तुम्ही सर्व माझ्या पाठीशी ज्याप्रमाणे आज पर्यंत उभे राहिलात तसेच यापुढे देखील उभे राहवे. मी कधी कोणाचं काम करताना कोणाची जात पहिली नाही. कोणाचा धर्म पहिला नाही. कोणकोणता पक्षाचा हे देखील मी आतापर्यंत कधी बघितलं नाही. मी काम करताना फक्त एक विचार केला की, हा व्यक्ती आपल्या गावाचा आहे. त्याच काम करणं आपलं कर्तव्य आहे. या भावनेतून मी आपल्या गावाचा विकास करण्याचा सुद्धा देखील प्रयत्न केला आहे. हिंदु-मुस्लीम ऐक्य जपून मी सर्वसामान्यांसाठी काम केलं. “जनतेच्या प्रेमानेच मी इथपर्यंत पोहोचलोय. विकास हीच माझी जात असून “जाती-पातीच्या राजकारणा पेक्षा विकासासाच मोठा विजय होईल असा ठाम विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त करत येत्या 20 तारखेला धनुष्य बाणाला जास्तीत जास्त मतदान करून मला पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचार सभेला पाळधी गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेशपाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारगटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेनामहिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंदपाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळपाटील, प्रतापराव पाटील, माजी नगराध्यक्षपी. एम. पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, पी. सी.पाटील, आरपीआयचे अनिल अडकमोल व व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते