Sunday, April 6, 2025
spot_img
27.5 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeblogशिरीषदादा चौधरी यांना प्रहार जनशक्ती, रिपब्लिकन पार्टी (ओ), आणि मराठा महासंघाचा पाठिंबा.

शिरीषदादा चौधरी यांना प्रहार जनशक्ती, रिपब्लिकन पार्टी (ओ), आणि मराठा महासंघाचा पाठिंबा.

लोकशक्ती न्यूज |नितीन ठाकूर

अमळनेर :- विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ओ) आंबेडकर गट, आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने अपक्ष उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा मतदारसंघात शिरीषदादांची उमेदवारी अधिक बळकट करणारा ठरेल, अशी अपेक्षा आहे.

…..प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा…..

प्रहार जनशक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रदीप किरण पाटील यांचा अर्ज त्रुटीमुळे फेटाळल्यानंतर पक्षाने शिरीष चौधरी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लोकनेते बच्चूभाऊ कडू आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे रवींद्र पाटील (तालुका प्रमुख), प्रमोद पाटील, प्रदीप गोसावी, शिवाजी पाटील, विपुल पाटील, आणि अपंग क्रांती संघटनेचे योगेश पवार, अशोक ठाकरे, साहेबराव महाजन, हमीद खाटीक यांसह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ओ) आंबेडकर गटाचा पाठिंबा…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ओ) आंबेडकर गटाने शिरीषदादांना जाहीर पाठिंबा देत मतदारसंघातील प्रचारात सक्रीय सहभाग घेण्याचे ठरवले आहे. यावेळी पारोळा तालुका अध्यक्ष दयाराम मोरे, पारोळा शहर अध्यक्ष विजय बागुल, तालुका संघटक भाऊसाहेब दामू पाटील, आणि उपाध्यक्ष जवाहरलाल केदार हे उपस्थित होते.

…. मराठा महासंघाचा पाठिंबा….

अखिल भारतीय मराठा महासंघानेही शिरीषदादांना पाठिंबा जाहीर केला आहे. महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख डॉ. बी. बी. भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील, ग्रामीण अध्यक्ष उमेश पाटील, आणि तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी हा पाठिंबा व्यक्त केला.

शिरीषदादांचे नेतृत्व आणि प्रभाव…..

शिरीष चौधरी यांनी कोरोना काळात केलेल्या जनसेवेपासून ते शेतकरी, युवक, आणि महिलांच्या प्रश्नांवरील त्यांच्या कार्यामुळे त्यांना व्यापक पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अमळनेर मतदारसंघातील विविध घटक त्यांच्यासोबत एकत्र येत आहेत. चुरस वाढणार या महत्त्वपूर्ण पाठिंब्यांमुळे अमळनेर विधानसभा निवडणुकीत चुरस अधिक तीव्र झाली आहे. शिरीष चौधरी यांचा विजय निश्चित करण्यासाठी सर्वच समर्थक एकजुटीने मैदानात उतरले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular