Sunday, April 6, 2025
spot_img
27.5 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeblogमाझी जात व धर्म म्हणजे माणुसकी व गावाचा विकास - ना. गुलाबराव...

माझी जात व धर्म म्हणजे माणुसकी व गावाचा विकास – ना. गुलाबराव पाटील

लोकशक्ती न्यूज| नितीन ठाकूर

धरणगाव / जळगाव दि. १७ : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘हवा में उडने वाले जमी पर नही टिकते, जनता उन्हे पसंद करती हैं जो काम में दिखते’ अशी शेरोशायरी करून भाषणाला सुरुवात केली. धरणगाव येथील कोट चौकात व पाळधी येथील झालेल्या या सभेत गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. धरणगाव शहरातील ७३ कोटीची पाणीपुरवठा योजना सुरू करून धरणगाव वासियांना पाणी पाजत आहे. पाणी पुरवठा सुरुळीत होऊ नये यासाठी अडथळा आणणारी मंडळी कोण आहे ? हे तुम्हाला देखील माहित आहे. विरोधकांनी प्रचार खालच्या पातळीवर नेत जात-पात आणि धर्माचे राजकारण सुरू केले आहे. मात्र माणुसकी व गावाचा विकास हीच माझी जात व हाच माझा धर्म आहे. माझं घर आणि दरबार हे जनतेसाठी शनी शिंगणापूर आहे. मी मतदार संघातील बारा बलुतेदार कार्यकर्त्यांना महत्वाची पदे देवून सन्मानित केले. एकनाथ शिंदे हे प्रत्येक महिन्याला आपल्या बहिणींना भाऊबीज देत आहे. आता पंधराशे वरून एकवीसशे रुपये देणारआहे. माझ्या लाडक्या बहिणींचा पाठींबा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टांबरोबरच जनतेच्या आशीर्वादाने भाऊबीजची परतफेड म्हणून तुम्ही बहिणीच मला विजयी करतील असा विश्वास जळगाव ग्रामीण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी धरणगाव व पाळधी येथील जाहीर सभेत व्यक्त केला. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेताला. प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मान्यवरांनी अभिवादन केले.

कोट बाजार व पाळधी मैदान फुल्ल रेकॉर्ड ब्रेक गर्दी

धरणगाव तालुक्यात कोट बाजार मैदानावर आयोजित सभेला रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती होती. विशेषतः महिलांचा हजारोंच्या संख्येनं सहभाग होवून या सभेची वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली. कोट बाजार मैदान पूर्ण क्षमतेने भरल्याने अतिरिक्त गर्दीसाठी जागा अपुरी पडली. सभेतील उत्साह आणि जल्लोषाने मैदान दणाणून गेले. देवकरांना सडेतोड उत्तर देवून रॉ. का. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार  यांनी देवकरांवर पुरावे सदर करून हल्लाबोला केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज म्हणाले, “गुलाबराव पाटील म्हणजे अडचणीच्या काळात अर्ध्या रात्री सुद्धा धावून येणारा नेता आहे. जिथे कोणी पोहोचू शकत नाही, तिथे स्वतः पोहोचून समस्या सोडवणारा हा नेता असून सामान्य माणसाच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असलेला सतत संपर्कात राहणारा नेता म्हणजे गुलाब भाऊ. त्यांनी या मतदारसंघासाठी हजारो कोटी रुपयांचा विकासनिधी आणला. तर गौप्रेमी ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांनी सांगितले की,  गुलाबराव पाटील यांना  वारकऱ्यांचे आशिर्वाद असून “धर्मसत्ता टिकविण्यासाठी राजसत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे गुलाब भाऊंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा,” असे भावनिक आवाहन केले.*

यावेळी धरणगाव व पाळधी येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, महिला आघाडीच्या सरिताताई कोल्हे- माळी आर. पी. आय. चे अनिल अडकमोल, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद नन्नवरे, ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, डी. जी. पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, पी.सी.आबा पाटील, ज्ञानेश्वर महाजन, पुष्पा महाजन, ऋषीकेश भांडारकर, संजय पाटील सर, आर.आर.पाटील, डी. ओ. शिवराज पाटील, पाटील, कैलास माळी, विलास महाजन दिलीप महाजन, संजय महाजन, श्यामकांत पाटील, जिजाबराव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील, ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प.भोजेकर महाराज, शिरीष बयास, रवी चव्हाण, जि.प.सदस्य गोपाल चौधरी , गटनेते कैलास माळी, पप्पू भावे, विजय महाजन, वासुदेव चौधरी, असलम सर, महेंद्र महाजन, भानुदास विसावे, किशोर झंवर, प्रेमराज बापू पाटील, रवी कणखरे, अंजली विसावे, कल्पना अहिरे, पुष्पा पाटील, भारती चौधरी, प्रिया इंगळे, ज्योती शिवदे, सलीम मोमीन, हाफिज शेख, शकील शेख, तौसिक पटेल, कालू वस्ताद, स्थानिक व परिसरातील सरपंच, शिवसेना, भाजपा, रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिजित पाटील व कैलास माळी यांनी केले.तर आभार विलास महाजन व प्रतापराव पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular