Thursday, April 10, 2025
spot_img
39.7 C
Delhi
Thursday, April 10, 2025
spot_img
Homeblogजळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात

जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव:- जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवसाआधीच धक्कादायक घटना समोर आलीय. मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे जाताना कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना किनगाव बु. जवळ घडलीय. याबाबतची माहिती माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलीय.याबाबत असे की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल थंडावाल्यानंतर आता उद्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी हे ईव्हीएम व मतदान साहित्यासह आज मंगळवारी (दि. १९) मतदान केंद्रांकडे रवाना होत आहे.यावेळी जळगाव येथून रावेर विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य घेऊन जाताना 11 रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती असलेल्या मीनाक्षी रामदास सुलताने, शिक्षण विस्तार अधिकारी, ज्योती गोपीचंद भादले प्रा शिक्षक, ,कविता बाविस्कर,लतीफा परवीन चांद खान यांच्या खाजगी गाडीला किनगाव बु. जवळ अपघात झालेला आहे. पुढील उपचाराकरिता सदर महिलांना चोपडा येते हलविण्यात आले आहे.

जिल्ह्यात ३ हजार ६८३ मतदान केंद्राची निर्मिती

जिल्ह्यात ३ हजार ६८३ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली असून मतदान कामकाज कामी १६ हजार ३५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हाभरातील १६ मतदान केंद्रावर मोबाईल नेटकर्व नसल्यामुळे त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हाभरात २९६२ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८५३ मतदारांनी गृह मतदानाचा फायदा घेतलेला आहे.

जिल्ह्यातील बंदोबस्त

मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आलेला असून एक पोलिस अधिक्षक, २ अप्पर पोलिस अधिकृक्षक, ८ उपविभागीय पोलिस अधिकारी, ३३ पॉलिस निरीक्षक, १४९ सहाय्यक / पोलिस उपनिरिक्षक, २५६९ पोलिस कर्मचारी यासोबतच अपर पोलिस महासंचालक कार्यालय, राज्य गुन्हे अन्वेशन विभाग, चाललुचपत प्रतिबंध विभाग, मुंबई रेल्वे यासह इतर विभागांकडील ३ उपविभागीय पोलिस अधिकारी, २५ सहाय्यक / उपनिरिक्षक, १३४० पोलिस कर्मचारी, वन विभागाकडील ११७ कर्मचारी, ३००० होमगार्ड, तसेच आयटीबीपी ३ कंपनी, सीआरपीएफ ४ कंपनी, आरपीएफ २ कंपनी, एसएसबी १ कंपनी, मध्यप्रदेश पोलिस ३ कंपनी, एसआपीएफ २ कंपनी असे एकूण १४ कंपन्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. यासोबत जिल्ह्यात १२२ पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेवेळी ड्रोनव्दारे नजर ठेवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular