लोकशक्ती न्यूज| नितीन ठाकूर
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात अंदाजे ५४.६९ टक्के मतदान झाले.जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रतिसाद संमिश्र दिसून आला असून, काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात मतदान झाले, तर काही ठिकाणी मतदान कमी प्रमाणात झालेले दिसले. आणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा लागलेल्या दिसून येत होत्या
जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३६ लाख ५५ हजार ३४८ मतदार आज बुधवारी मतदानाचा हक्क बजावून १३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे:-
१५ अमळनेर -55.10%
१२ भुसावळ -52.44%
१७ चाळीसगाव -56.05%
१० चोपडा -52.13%
१६ एरंडोल- 58.36%
१३ जळगाव सिटी- 45.11%
१४ जळगाव ग्रामीण -60.77%
१९ जामनेर -57.34%
२० मुक्ताईनगर- 59.69%
१८ पाचोरा -46.10%
११ रावेर – 62.50