लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

पाळधी:- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात मतदान शांततेत पार पडले पाळधी बुद्रुक मध्ये ७४ टक्के तर पाळधी खुर्द मध्ये ६९ टक्के मतदान झाले यात पाळधी खु. येथील महात्मा फुले नगरमधील जि.प. शाळेत महिला कर्मचाऱ्यांचे मतदान केंद्र क्रमांक २६७ हे गुलाबी बूथ होते. तेथील महिला कर्मचाऱ्यांनी गुलाबी रंगाचे फेटे परिधान केले होते. हे केंद्र सर्वात आकर्षक ठरले. दरम्यान, मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी भेटी दिल्यात. या वेळी माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, विक्रम पाटील यांनी ही कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावर भेटी दिल्या. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक घोलप, धरणगावचे पो.नि. पवन देसले यांनी भेट देऊन पाहणी केली. मतदान केंद्रावर पाळधीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. ग्राम विस्तार अधिकारी दीपक पाठक व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली. पाळधीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.