Sunday, April 6, 2025
spot_img
38.3 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeblogजळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; गड राखण्यात यशस्वी-आ. गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; गड राखण्यात यशस्वी-आ. गुलाबराव पाटील

Oplus_131072

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव :- जळगाव जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे महायुतीने सर्व ११ जागा जिंकत आपले वर्चस्व राखले आहे व महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आणि आम्ही गड राखण्यात यशस्वी झालो असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले हा विजय आमचा नाही तर आमच्या कार्यकर्त्यांचा आहे,आमच्या लाडक्या बहिणींचा आहे व आम्ही आजपर्यंत केलेल्या कामाचा आहे , व जनतेने हे पुन्हा दाखवून दिले की आम्ही महायुती सोबत जाऊन काही चुकीचं केलेलं नाही

महाविकास आघाडीला जिल्ह्यात खातेही उघडता आले नाही. काँग्रेसकडे असलेली रावेरची जागाही हातून गेली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा या ठिकाणी पुन्हा विद्यमान आमदारांना मतदारांनी संधी दिली आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वच युतीचा झेंडा फडकला आहे.मतमोजणीला सकाळी साडेआठ वाजेता प्रारंभ झाल्यानंतर सुरूवातीपासूनच युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम दिसून आली. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण व शिवसेना (उबाठा) गटाचे उन्मेश पाटील यांच्यात लढत झाली. यात मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यात सर्वाधिक लीड घेत विजय नोंदविला. जळगाव ग्रामीणमध्ये आजी- माजी पालकमंत्र्यांमध्ये मुख्य लढत झाली. यात शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा दारुण पराभव केला.राज्याचे लक्ष लागलेल्या जामनेर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रा. दिलीप खोडपे यांचा पराभव केला. मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रोहिणी खडसे यांचा पराभव केला. तर पाचोरा येथील लक्षवेधी लढतीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील यांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे व उबाठा वैशाली पाटील यांचा पराभव केला.चोपड्यात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत सोनवणे व उबाठा गटाचे प्रभाकर सोनवणे यांच्यात सरळ लढत होऊन चंद्रकांत सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणला. रावेरमध्ये भाजपचे अमोल जावळे यांनी काँग्रेसचे धनंजय चौधरी यांना आस्मान दाखवित काँग्रेसकडे असलेली एकमेव जागा खेचून आणली. भुसावळमध्ये पुन्हा भाजपचे संजयसावकारे यांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर यांचा पराभव केला. जळगाव शहर मतदारसंघात भाजपाचे सुरेश भोळे यांनी विजय नोंदवित शिवसेना ठाकरे गटाचे जयश्री महाजन यांचा पराभव केला. अमळनेरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांनी अपक्ष व माजी आ. शिरीष चौधरी, काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांना पराभूत केले. एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांनी माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular