Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogजळगांवात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, शहर काँग्रेस उपाध्यक्षा योगिताताई शुक्ल यांचा भाजप...

जळगांवात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, शहर काँग्रेस उपाध्यक्षा योगिताताई शुक्ल यांचा भाजप मध्ये प्रवेश

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकुर

जळगांव :- शहरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, शहर काँग्रेस उपाध्यक्षा योगिता ताई शुक्ल यांच्यासह असंख्य महिला आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्राचे नेते श्री. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा सौ. उज्वलाताई बेंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.भाजप मंडळ क्रमांक १ तर्फे आयोजित सदस्य नोंदणी अभियान व जळगाव शहराचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या सत्कार कार्यक्रमात या कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी आमदार राजुमामा भोळे व उज्वलाताई बेंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रवेश सोहळ्यात काँग्रेस उपाध्यक्षा योगिताताई शुक्ल, अमिनाताई तडवी, रत्नाताई बागुल, सुमनताई मराठे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सुजनाताई पवार, कविताताई माळी, शानुबाई भोई, मुशीर दादा तडवी, दिपक नाझरकर, भुषण सांगोरे यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची सदस्य नोंदणी करण्यात आली

यावेळी भाजप जेष्ठ नेते सुभाष तात्या मंडळ १ चे अध्यक्ष संजय भाऊ शिंदे, नगरसेवक राजू भाऊ मराठे, अनुसूचित जमाती मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे, सरचिटणीस जहांगीर भाई खान, उन्मेश भाऊ देशपांडे, महेश भाऊ चौधरी, दिनेश भाऊ पुरोहित, मिडिया प्रमुख मनोज भांडारकर, दिलीप भाऊ नाझरकर, ज्योती ताई राजपूत, संगीता ताई पाटील, प्रसाद शुक्ल, हरीश भाऊ सोनवणे, वासिम भाई शेख आणि अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular