
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
धरणगाव :- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी विधानसभेत पराभव पत्करावा लागला परंतु कार्यकर्ते ची बोटावरची शाई पुसत नाही तेव्हड्यात गुलाबराव देवकर यांनी महायुती प्रवेश च जाहीर केले, गुलाबराव देवकर चा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पदाधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ८४००० एवढे मत धिक्के मिळवू दिले यांचा पश्चाताप म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ ” आत्मक्लेश’ मूक आंदोलन करण्यात आले
यावेळी शिवसेना सहसपर्क प्रमुख(उबाठा) गुलाबराव वाघ , नगराध्यक्ष युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी , मा जि प उपाध्यक्ष जानकिराम पाटील, शिवसेना उलजिल्हा संघटक ऍड शरद माळी ,कॉग्रेस चे जेष्ठ नेते सम्राट परिहार तालुका संघटक लीलाधर पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली यावेळी उपस्थित शहर प्रमुख भागवत चौधरी युवासेना शहर लक्ष्मण महाजन, नगरसेवक किरण मराठे , जितेंद्र धनगर, जिल्हा संघटक विनोद रोकडे उपजिल्हा प्रमुख हेमंत महाजन, विभाग प्रमुख रमेश चव्हाण , राहुल रोकडे महेंद्र चौधरी ज्ञानेश्वर महाजन, फिरोज शेख भैय्या ठाकूर, संजय नारखेडे सह शिवसेना युवासेना चे पदाधिकारी उपस्थित होते
गुलाबराव देवकरांच्या प्रवेशाला अरविंद मानकरींचा विरोध
जळगावः राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर हे लवकर अजित पवार गटात प्रवेश करणार असले तरी त्यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांचा प्रवेश करू नये यासाठी मानकरी सोमवार दि.९रोजी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.दोन दिवसापुर्वीच गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत जळगाव ग्रामिणमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात कार्यकत्यांनी आपण कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश करावा अशी मागणी केली. त्यानंतर गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटात प्रवेश घेण्याच्या राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहे. मात्र त्यांच्या प्रवेशाला अरविंद मानकरी यांनी विरोध दर्शविला आहे.