Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogदोनगाव येथे बस इलेक्ट्रिक खांबाला धडकली, मोठा अनर्थ टळला,२८ प्रवासी जखमी

दोनगाव येथे बस इलेक्ट्रिक खांबाला धडकली, मोठा अनर्थ टळला,२८ प्रवासी जखमी

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

पाळधी :- दोनगाव गावाजवळील स्मशानभूमीजवळ भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांबावर धडकल्याने पुढील अनर्थ टळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. ही बस लाडली येथून निघून जळगाव येथे रेल मार्गे येत असताना दोनगाव गावाजवडील स्मशानभूमी नजीक अपघात घडला.

लाडली गावात मुक्कामी असलेली बस नेहमीप्रमाणे आज लाडली येथून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघाले पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना दोन गावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील यांचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावरील जवळील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली. बस थेट नाल्यात गेली असती पण सुदैवाने इलेक्ट्रिक खांब्याला पुढील दुर्घटना टळली आहे. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular