लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
एरंडोल : कर्जदार सदस्यांकडुन कर्जाचे जमा झालेले दोन लाख ७४ हजार ४५६ रुपये संस्थेत जमा न करता परस्पर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी भारत फायनान्शीयल इन्क्लुजन लिमीटेड कंपनीचे एरंडोल शाखेचे ब्रँच मॅनेजर मनिष पाटील यांच्या तक्रारीनुसार रामेश्वर पाटील (रा.भुसर्डी) याच्या विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा गुरुवार, १२ रोजी दाखल करण्यात आला.
भारत फायनान्शीयल इन्क्लुजन लिमीटेड, आनंदनगरची एरंडोल येथे शाखा आहे. येथे शाखा ब्रँच मॅनेजर पदावर मनिष पाटील हे कार्यरत आहेत. शाखेतर्फे कर्जदार सदस्यांना कर्जाचा पुरवठा होतो. संशयीत रामेश्वर पाटील याने कर्जदार सदस्यांकडुन कर्जाचे हप्ते जमा केले. ही रक्कम भारत फायनान्शीयल कंपनीत जमा करण्याची त्यांची जबाबदारी होती. मात्र त्यांनी या रक्कमेचा भरणा न करता स्वतःकडे ठेवुन अपहार केला. संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विलास पाटील करीत आहेत.