Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogभडगाव ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे सलग दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन, त्यामुळे...

भडगाव ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे सलग दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन, त्यामुळे नागरिकाची गैरसोय

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

भडगाव ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे सलग दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलनामुळे नागरिकाची गैरसोय होत आहे धरणगाव तालुक्यातील चांदसर बु. येथील गिरणा नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल खात्याच्या पथकावर वाळू चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली असुन याचा निषेध म्हणुन भडगाव ग्राम महसूल अधिकारी यांनी आज कामबंद आंदोलन करत श्री. शितल सोलाट यांना निवेदन देण्यात आले आहे.

सध्या जळगांव जिल्ह्यात वाळू मफियानी कमी कालावधीत श्रीमंत कसे होता येइल म्हणुन अवैध वाळूचा धंदा जोरात सुरु केला आहे.हा धंदा अवैध असून यावर नियंत्रण ठेवण्याचे व कारवाई करण्याचे अधिकार महसूल विभागाला आहे. या अनुषंगाने काल रात्री धरणगाव येथील तहसीलदारांनी चांदसर येथील गिरणा नदी पात्रात कारवाई करण्यासाठी पथक तयार केले. हे पथक नदीच्या पात्रात उतरल्यावर तिथे असलेल्या सुमारे १५ ते १६ वाळू तस्करांनी या पथकावर हल्ला सुरू केला. यात तलाठी दत्तात्रय पाटील यांना जोरदार मारहाण करण्यात आली. त्यांच्या पायावर फावड्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आल्यामुळे ते जखमी झाले. दरम्यान वाळू तस्करांनी मारहाण सुरू केल्यामुळे पथकातील इतरांनी घटनास्थळावरून पळ काढून आपला जीव वाचवला.तर दत्तात्रय पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गिरणा नदीपात्रातून वाळूचा अंदाधुंद उपसा होत असून तस्कर हे कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. यातच आता थेट तलाठ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून या प्रकरणाच्या संदर्भात पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून या घटनेचा भडगाव तालुका तलाठी संघाच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले यावेळी भडगाव ता. अध्यक्ष व्ही.सी. पाटील, सचिव व्ही. पी. शिंदे, राहुल पवार,व्ही.के.माने,डी. एल येंडे, ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, पाशा हलकारे,प्रशांत कुंभारे,लोकेश महाजन, शीतल राजपूत, प्रियंका शिंदे, धनलक्ष्मी टेंभुर्णे, भाविका पाटील, गितेश महाजन, करण कुलकर्णी, अभिमन्यू वारे, एम जे खाटीक, भडगाव मंडळ अधिकारी कुणाल कोळी,कोळगाव मंडळ अधिकारी, भरत पाटील, आमडदे वृषाली सोनवणे, कजगाव ग्राम महसूल अधिकारी चेतन बैरागी, ग्रामसुल अधिकारी शुभम चोपडा,योगेश पाटील ,नीता अकोटकर, कल्याणी पाटील ,विवेक महाजन, संजय सोनवणे , समाधान हुळूले, कजगाव मंडळ अधिकारी अनिल निकम यांच्या सह सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते….

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular