Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogशेतकरी व दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ! - मंत्री गुलाबराव पाटील

शेतकरी व दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ! – मंत्री गुलाबराव पाटील

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

पाळधी:- स्वागता प्रसंगी भावनिक सूर लावत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “माझं मंत्रीपद तमाम जनतेचं आहे. सर्व सामान्यांच्या हितासाठी आहे. तुमचा विश्वास आणि आशीर्वादच माझ्या ताकदीचा खरा आधार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी मी अविरत प्रयत्न करत राहीन.”असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या चौथ्यांदा मंत्रीपदाच्या शपथग्रहणानंतर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला. नागपूर अधिवेशनानंतर पाळधीत प्रथम आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. भगव्या पताका आणि कमानींनी संपूर्ण परिसर सजला होता.

सकाळ पासूनच पाळधीच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसैनिक, भाजप – राष्ट्रवादी महायुतीतील कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. यावेळी उपस्थीत शेतकरी बांधवांनी मंत्री पाटील यांना आपल्या “मातीचा राजा” असल्याचे संबोधले.शुभेच्छा स्वीकारण्यापूर्वी पाळधी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले…

जिल्ह्यातील महायुतीचे नेते व अधिकाऱ्यांची उपस्थिती

अभिनंदन व शुभेछ्या सोहळ्याला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, माजी महापौर ललित भाऊ कोल्हे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, अनिल भोळे, रवी कापडणे, भाजपाचे जि. प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, चंद्रशेखर उत्तरदे, गोपाळ भंगाळे, गिरीश वराडे, मिलिंद चौधरी, राजू सोनवणे, चंद्रशेखर अत्तरदे, राष्ट्रवादीचे निर्दोष पवार, अरविंद मानकरी, सेनेचे तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी. ओ पाटील, गजानन नाना पाटील, संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल बापू चौधरी, प्रतापराव पाटील, जळगाव महानगर प्रमुख व नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, भाजपा, राष्ट्रवादीचे व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांसह महायुतीचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, आणि मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जि.प.चे साप्रविच्या उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती एम . बी. कुडचे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनीही मंत्री गुलाबराव पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular