
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव:- महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदांकडून माहिती प्राप्त झालेली आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषदांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली आणि फेस रिडिंग प्रणाली यांसारख्या अद्ययावत यंत्रणांचा वापर करून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवली जाणार असल्याचे समजते.
विशेषतः, ज्या ग्रामपंचायती शहरी भागांच्या जवळ आहेत त्याठिकाणी बायोमेट्रिक हजेरी राबविण्यात येत आहे. तर अतिदुर्गम, डोंगराळ ग्रामपंचायतींमध्ये नेटवर्क भागातील कनेक्टिव्हिटी नसलेल्यामुळे बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबविण्यात अडचणी येऊ शकतात. तथापि, सध्याच्या परिस्थितीत अनेक भागांमध्ये कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. त्यामुळे, शहरी भागाच्या जवळील किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये बायोमॅट्रिक किंवा GPS हजेरी प्रक्रिया राबविणे शक्य आहे. यावरून, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारियोंच्या बायोमॅट्रिक किंवा GPS हजेरी प्रणालीची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावी, अशी विनंती करण्यात येत आहे.