Saturday, April 5, 2025
spot_img
25.9 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogरात्रीच्या सुमारास भीषण आग; एमआयडीसीतील कंपनी जळून खाक

रात्रीच्या सुमारास भीषण आग; एमआयडीसीतील कंपनी जळून खाक

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव:- येथील औद्योगिक वसाहत मध्ये डी सेक्टर मधील कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कंपनीत जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसी मध्ये डी सेक्टर मध्ये सिद्धिविनायक इंडस्ट्रीज ही चटया उत्पादन करणारी फॅक्टरी आहे. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास या फॅक्टरीतील एका भागाला आग लागली. काही क्षणातच आगीने भीषण स्वरूप धारण केले. यातच येथील एका रूम मध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग अजून जास्त प्रमाणात पसरली.

दरम्यान आगीचे वृत्त समजतात परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. महापालिका व जैन इरिगेशन येथील अग्निशामक बंब तातडीने पाचारण करण्यात आले. मात्र ही आग इतकी भीषण होती की यावर काबू मिळवण्यासाठी बराच वेळ लागला. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक बंबांनी आग विझवण्याचे काम सुरूच ठेवले होते. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण पसरले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular