Saturday, April 5, 2025
spot_img
25.9 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogपाळधी येथे दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

पाळधी येथे दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

पाळधी:- पाळधी येथे रात्री उशीरा दोन गटांमधील संघर्ष उफाळून आला पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला असून गावातील वातावरण तणावग्रस्त मात्र नियंत्रणात असल्याचे समजते.या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, काल रात्री नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधुम सुरू असतांना तालुक्यातील पाळधी येथे मात्र दोन गटांमधील संघर्ष उफाळून आला. रात्री दहानंतर दोन गटांमधील संघर्षाने भीषण रूप धारण केले. यातून गावातील चार दुकानांना आग लागली तसेच फलक आणि वाहनांची तोडफोड देखील झाली.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाळधी व धरणगावच्या पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकाने पाळधी येथील जमावाला पांगवले. तसेच अग्नीशामक दलाच्या बंबांनी दुकानांना लावलेली आग नियंत्रणात आणली. दरम्यान, पोलिसांनी दंगलीच्या संदर्भात तात्काळ कृती करत काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. तर याबाबत रात्री उशीरापर्यंत पाळधी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.पाळधी गावात सध्या वातावरण हे पूर्णपणे नियंत्रणात आले. कुणीही समाजमाध्यमांवर या संदर्भात अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular