
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव:- पाळधी-तरसोद महामार्गावर असलेल्या समस्यांसंदर्भात मंत्री संजय सावकारे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत शनिवारी धारेवर धरले. मंत्री सावकारे या वेळी महामार्गावरील वाहतुकीच्या अडचणी सुटत नसल्याने अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले.या महामार्गावरील लहान समस्या त्वरित दूर करा, अन्यथा टोल नाके बंद करू. रस्ते आणि पैसे कुणाच्या बापाचे नाहीत. मंत्री संजय सावकारे न्हाईच्या अधिकाऱ्यांवर भडकले.
पुढच्या बैठकीपर्यंत जर महामार्गावरील समस्या कमी नाही झाल्या, तर तुम्हाला टोल वसुली करू देणार नाही, असा सज्जड दम मंत्री संजय सावकारेयांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांना भरला. गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालेले आहेत. अनेकदा तक्रारी करून, सूचना करून देखील त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने केंद्रीय मंत्री रक्षा खडसेदेखील संतापल्या. दिशा समितीच्या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे सर्व आमदार, अधिकारी उपस्थित होते