Saturday, April 5, 2025
spot_img
25.9 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogअल्पवयीन दुचाकीधारकांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई

अल्पवयीन दुचाकीधारकांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

जळगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील मु.जे. महाविद्यालय परिसर, नुतन मराठा महाविद्यालय, बेंडाळे महाविद्यालयासह शहरातील प्रमुख भागात धडक मोहिम राबविण्यात आली. अल्पवयीन वाहनधारकांवर सुमोर १० हजार रूपयांच्या दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेने मंगळवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत केलेल्या कारवाईत शंभरहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी दिली आहे.

जिल्हाभरात वाहतूक सप्ताह निमित्ताने जनजागृती केली जात आहे. यात अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देवून नये असे सांगितले जाते. परंतू याकडे पालक दुर्लक्ष करून अल्पवयीन मुलाना वाहन चालविण्यासाठी देत असल्याने रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात होत आहे. गेल्या १० दिवसांपुर्वी देखी जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या सुचनेनुसार शहर वाहतूक शाखा आणि संबंधित भागातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त करावाई करत १५० हून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर वाहतूक सप्ताह असल्याने वाहतूक शाखेच्या वतीने महाविद्यालयात जावून वाहतूकीबाबत जनजागृती केली. तरी देखील पालकांकडून सुधारणा होत नसल्याचे दिसून आले.

त्यानुसार आज पुन्हा शहर वाहतूक शाखेच्या पथकाने मु.जे. महाविद्यालय परिसर, नुतन मराठा महाविद्यालय, बेंडाळे महाविद्यालय, पांडे चौक, शास्त्री टॉवर चौक, बसस्थानक परिसर, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक यासह इतर भागात मंगळवारी ७ जानेवारी ते दुपारी २ वाजेपर्यंत १०० हून अधिक अल्पवयीन दुचाकीधारकावर कारवाई केली आहे. दरम्यान, संबंधित अल्पवयीन मुलांच्या पालकांना वाहतूक शाखेत बोलविण्यात आले असून यासाठी प्रत्येकी १० हजारांचा दंड वसुल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या माहिमेनंतर पुन्हा शहर अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्यावेळी जर अल्पवयीन मुले वाहन चालवतांना आढळून आल्यास थेट पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येईल अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular