
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे बुधवार, 8 जानेवारी रोजी जळगाव व भुसावळच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याबाबत प्रशासनाला दौरा प्राप्त झाला आहे.
जळगावात दीक्षांत समारंभाला उपस्थिती
बुधवारी सकाळी 09.15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे प्रयाण, सकाळी 09.45 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आगमन, सकाळी 10.00 ते 11.05 वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या 33 व्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती.
सकाळी 11.05 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून मोटारीने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजकडे रवाना, सकाळी 11.30 वाजता राज्यपालांचे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे आगमन, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आयोजित कार्यक्रमाला सकाळी 11.30 ते 12.10 वाजेपर्यंत उपस्थिती. दुपारी 12.10 वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथून मोटारीने रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड, जळगाव येथील कार्यक्रमासाठी रवाना दुपारून भुसावळात ट्रॅकचे उद्घाटन दुपारी 12.30 वाजता रेल्वे क्रीडा मैदान, भुसावळ येथे आगमन होईल. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड येथे नवीन सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन, ट्रॅक मेंटेनर्स आणि ‘हॉस्पिटल ऑन व्हील’चा सत्कार, दुपारी 1.20 ते दुपारी 3.00 राखीव व त्यानंतर दुपारी तीन वाजता रेल्वे क्रीडा मैदान येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे रवाना होवून दुपारी 3.40 वाजता जळगाव विमानतळावर त्यांचे आगमन होवून ते विमानाने रवाना होतील.