” कालच उदय आणि उज्वलाचं लग्न झालं आणि आज त्या दोघांच्या आयुष्याला पूर्णतः कलाटणी देणारी एक स्वप्नवत रात्र होती सुहाग रात्र, “दोघांचाही प्रेम विवाह होता, ती त्याला म्हणाली होती माझ्या पप्पांना सांगितल्याशिवाय एक कामही मी करत नाही… आणि हा लग्नाचा एवढा मोठा निर्णय त्यांच्या विरुद्ध कसा घेऊ?आणि त्यांना सांगितलं तर तुझ्याशी लग्न ते करू देणार नाहीत… मला तुही पाहिजे आणि माझे पप्पा पण पाहिजे काय करू…?
“उदय तिला म्हणाला, ” आपण लग्न करू त्यांना न माहिती… थोड्या दिवसांनी त्यांना कळवू वाटल्यास… आपलं लग्न झालेलं असेल सगळं काही संपलेल असेल तेव्हा नावीलाजाने का होईना तुझ्या पप्पांना हो सांगावच लागेल.. आपले लग्न मान्य करावंच लागेल..
त्याच्या गोष्टींना भूलून तिने लग्न केलं होतं, आणि आज त्यांची सुहागरात्र होती…,सुंदर सेज सजवण्यात आलेली होती… आणि तिला घुंगट ओढून तिकडे त्याच्या रूम मध्ये अगोदर घेऊन जाण्यात आले होते…
तो थोड्या वेळाने रूममध्ये गेला मनात थोडीशी धडधड थोडी उत्कंठा, थोडीशी हुरहुर, सगळ्याच संमिश्र भावनांनी त्याने तिच्या रूममध्ये प्रवेश केला…
बघतो तर सुहाग रात्रीच्या सेज वर ती नव्हती…गायब झालेली होती..,त्याने रूम मध्ये इकडे तिकडे बघितले पण ती कुठेच नव्हती तिथे त्याला चिठ्ठी लिहिलेली सापडली..
चिठ्ठी
प्रिय उदय, मला माफ कर, मी तुझ्या पेक्षाही जास्त ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याकडे जात आहे… त्याने जर सांगितले स्वखुशीने तर मी तुझ्याकडे येईन..
तोपर्यंत वाट बघ, “त्यांनी जर नाही पाठवले तर मला विसरून जा कारण तुझ्यापेक्षाही माझ्या आयुष्यात त्यांचं महत्त्व जास्त आहे..
ती चिठ्ठी वाचून त्याला भयंकर संताप आला… तो चिडचिड करू लागला हिने मला अगोदरच का नाही सांगितले का फसवले…?त्याने मनात ठरवले की तिच्या बापाला हेच माहिती आहे की मीच तिला पळवून नेले आहे..आता हिच्या बापा जवळ जातो आणि त्याच्या मुलीचे कारणामे सांगतो सगळे…तो संतापात तिच्या बापाच्या घरी गेला,आणि तिथले दृश्य बघितले तर त्याचा संताप कुठच्या कुठे पळून गेला त्याच्याही डोळ्यात अश्रू आले…ती तिच्या बापाच्या जवळ होती आणि सांगत होती.. मला माफ करा पप्पा मी तुमच्या मनाविरुद्ध गेली… त्यासाठी मला जी सजा देणार ती मला मान्य आहे… वाटल्यास मी उदयला विसरून जाईल..
तिचे पप्पा म्हणाले, ” अग वेडे आपल्या मुलीचं वाईट व्हावं अशा कुठल्या बापाला वाटतं?
हो जर उदय खरंच वाईट मुलगा असता तर तू मला कितीही वाईट म्हटलं असतं तरी मी लग्न करू दिलं नसतं, पण डोन्ट वरी उदय खूप चांगला मुलगा आहे तुझ्यासाठी योग्य आहे तू योग्य निवड केली आहेस म्हणून माझा तुला पाठिंबाच असता… तू पळून गेली वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटत होतं की जो माझ्या आयुष्यातला जो सुवर्णक्षण होता कन्यादान करायचा तो मी गमावला असं मला वाटत होतं…पण आत्ता मी स्वतः माझ्या मुलीचा हात उदयच्या हातात देऊन कन्यादानाचा आनंद घेतो…
त्यांनी तिचा हात उदयच्या हातात दिला आणि सांगितलं सांभाळ बाबा माझ्या पोरीला, आणि सुखी राहा दोघे, माझा हृदयापासून तुम्हा दोघांना आशीर्वाद आहे..मात्र हे लक्षात ठेव, तिचे हे शेवटचे अश्रू असतील .. जर यापुढे माझ्या पोरीच्या डोळ्यात अश्रू आले तर माझ्याशी गाठ आहे सांगून ठेवतो..उदय भाव विभोर होत म्हणाला, “मला माफ करा बाबा, मी तुमच्या मुली बद्दल थोडासा चुकीचा विचार केला.. आणि मी तुम्हाला न सांगता तिला पळवून न्यायला नको होतं…उदय अश्रू भरल्या नयनांनी हसत म्हणाला, “पप्पा तुमच्या मुलीच्या आयुष्यातले असली हिरो तुम्ही आहेत… असा हिरो तिच्या पाठीमागे असताना माझी काय हिंमत तिच्या डोळ्यात अश्रू आणण्याची..आणि मी सुद्धा देवाला एकच पार्थना करतो की, भविष्यात जर मला परमेश्वराने बाप होण्याचे सुख दिलं… तर देवा मला प्रथम मुलगीच दे, मी पण तुमच्यासारखा माझ्या मुलीचा हिरो होईन…
तात्पर्य:~असे असते हे बाप बेटी चे नाते, म्हणून कुठल्याही मुलीने बापा विरुद्ध लग्न करून कन्यादानच सुख त्यांच्यापासून हीरावून घेऊ नका…
तसेच आपल्या नवऱ्याशी प्रामाणिक राहून, त्याच्याशी सुखाने संसार करून आपल्या आई-बाबांचं नाव पुढे करा…आणि कुठल्याही बापाने लग्न करून दिलं म्हणजे संपली आपली जबाबदारी, असं न सांगता, तुमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तिच्या पाठीशी उभे रहा.. तिच्या सुखदुःखाचे असली हिरो तुम्हीच आहात… कारण सगळेच नवरे खूप प्रेम करणारे नसतात… काही तिला खूप त्रास देणारेही असतात… म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्या… तुम्ही स्वतः तिच्या पाठीशी उभे राहिला तर कोणीच तिला त्रास द्यायची हिंमत नाही करणार, आणि मुलांनी सुद्धा दुसऱ्याची मुलगी म्हणजे आई-बाबांनी त्यांच काळीज काढून आपल्याला दान केलेले असते असे समजून तिच्या मान सन्मानाची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे.. असे हे कन्यादान.
सौ.स्वाती रवींद्र पाटील
मू.पो. गलवाडे ता. अमळनेर जि. जळगाव