
सुखदेव गायकवाड
शेवगाव प्रतिनिधी :
मला लोकसभेत सर्व राजकीय पक्षाने मला निवडणुकीत मदत केली असल्याने मी सर्व पक्षीय कार्यकर्ता असून सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकी नंतर अकषबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते त्यांनी करू नयेत अन्यथा दि ४ जून नंतर सर्व हिशोब चुकता केल्या शिवाय गप्प बसणार नाही असा संतप्त सवाल अहमदनगर लोकसभा मतदार संघातील शरद पवार राष्ट्रवादी मित्र पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे
शेवगाव तालुक्यातील कोनोशी युवा नेते राजेंद्र दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केला
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते व केदारेश्वरचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, शिवशंकर राजळे, ज्येष्ठ नेते दिनकर पालवे, शिवसेना नेते रामदास गोल्हार, रफिक शेख, केदारेश्वर चे संचालक श्रीमंत गव्हाणे, गहिनीनाथ शिरसाट, भाजपचे बंडू रासने, शेवगाव बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, युवा नेते नंदकुमार मुंडे, शिरीष काळे, बोधेगावचे उपसरपंच संग्राम काकडे, मयूर हुंडेकरी, बालमटाकळीचे उप सरपंच घोरपडे,एकनाथ शिंदे सेना शेवगाव तालुका अध्यक्ष साईनाथ आधाट, नामदेव कसाळ,वंचितचे उमेदवार दिलीप खेडकर, नवनाथ खेडकर यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होत राजेंद्र दौंड यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या तर
माजी आ निलेश लंके म्हणाले पैसे कमविण्या पेक्षा जीवाभावाची माणसं सोबत असली तर जीवनात काही कमी पडत नाही मी प्रस्थापितांच्या विरोधात सामन्य जनतेला नेहमी भरीव मदत केली आहे माझा प्रस्तापितांच्या विरोधात लढाई सुरू आहे लोकसभेत चार पिढ्या राजकारण करणाऱ्यांच्या (सुजय विखे यांचे नाव न घेता )मोठ्या लोकांच्या विरोधात लढणे हे सोपे काम नव्हते पण जिवाभावाचे सामान्य लोक व सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच अनेक नेत्यांनी मला निवडणुकीत भरीव मदत केली असल्याने मोठ्या फरकाने विजय होणार असल्याचे जाहीर सांगितले तर आज मी सर्व पक्षाचा असल्याचे आवरजून नमूद केलं
मला असंख्य अदृश्य राजकीय शक्तीने मदत केली आहे, कोणी कोणी मदत केली आज जाहीर करणार नाही पण निकालानंतर सर्व कळणार आहे. आमच्यावर सातत्याने गुंडगिरीचा आरोप केला जात आहे पण आम्ही गुंड नाहीत तर गरिबाला छळनारांचा बंदोबस्त करून गुंडगिरी थांबविण्यासाठी प्रयत्न केला आहे.