
कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के
दि. ०१, छत्रपती संभाजीनगर येथील माजी आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी आज शेवगाव तालुक्यातील कांबी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. या वेळी कांबी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवगाव तालुक्यातील कांबी या ठिकाणी आबासाहेब काकडे शिक्षण समूहाच्या कांबी हायस्कूल कांबी येथे काही कालावधी शिक्षक या पदावर कार्यरत असलेले व नंतर विभागीय आयुक्त पदाचा उत्कृष्ट कार्यकाल सांभाळणारे भापकर सर कांबी गावातील ग्रामस्थ यांच्या वर असलेले प्रेम ,आपुलकी ,जिव्हाळा व जुन्या आठवणींना उजाळा
देण्यासाठी, आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी दि ३१ रोजी कांबी या ठिकाणी आले असता त्यांचा श्री विश्वासनंद महाराज संस्थान, महालक्ष्मी देवी संस्थान व सकल धनगर समाजबांधव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी सरपंच नितीश पारनेरे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन प्रशांत मडके, बाळासाहेब होळकर, डॉ सतिश मनचुके, डॉ अरुण भिसे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अहिल्यानगर उपाध्यक्ष बाजीराव लेंडाळ, राहुल गावडे, अमोल सोरमारे, शिवाजी होटकर, लहू चांडे, बाळू डुकरे, तानाजी शेटे,नंदकिशोर कुऱ्हे, श्रीराम नन्नावरे,अदि ग्रामस्थ उपस्थित होते.