
कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के
दि. ०१, शिक्षक हा विद्यार्थ्यांचा भविष्य घडविणारा गुरु असून ते शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान देण्याचे काम करतात व त्यांचे काम अत्यंत मोलाचे असल्याचे मत सेवा निवृत्त आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केले आहे. जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव ने संचलित नेवासा तालुक्यातील देवगाव येथील श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर विठ्ठल मुरकुटे यांनी ३२ वर्ष सलग मुख्याध्यापक म्हणून काम केले असून वयोमानानुसार त्यांची सेवा समाप्त झाली असल्याने त्यांचा सेवापुर्तीचा कार्यक्रम शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील श्री रामेश्वरदासजी विद्यालयात पार पडला असून या वेळी अध्यक्ष पदावरून डॉ.भापकर बोलत होते.या वेळी बोलताना ते म्हणाले की, मुरकुटे यांनी हातगावात १७ वर्ष, लाडजळगावात २ वर्ष व देवगाव येथे १३ वर्ष अशी मिळून सलग ३२ वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा केली असून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती आजच्या उपस्थितीवरून दिसून येत असून असेच त्यांच्या हातून जे मौल्यवान काम झाले आहे.असे काम इतरांनी करावे.असेही भापकर यांनी म्हटले आहे.तर या वेळी बोलताना ह.भ.प.राम महाराज झिंजूर्के म्हणाले की, शिक्षकी पेशा हा पवित्र काम करणारा असल्याने त्यांच्या हातून जी मुले घडली जातात.ती मुले वेगवेगळ्या दर्जाच्या उच्च पदावर जाऊन काम करत असल्याने बालपणातच त्यांचेवर होणारे शिक्षकी संस्कार भविष्यासाठी प्रेरणा देणारे ठरत असतात. अनेक संत महतांनी बालवयातच जे पराक्रम केले आहे. त्याची ही माहिती झिंजूर्के महाराज यांनी दिली आहे. तर सत्काराला उत्तर देताना श्रीधर मुरकुटे म्हणाले की, मी मुख्याध्यापक म्हणून गावातच रुजू झालो. मात्र १७ वर्षात मी कधी ही शाळेव्यतिरिक्त दुसरे एकही काम केले नाही. मात्र हे करत असताना मला गावातून सर्वच ग्रामस्थांची योग्य अशी साथ मिळाली असल्यानेच विद्यालयाची भरभराट झाली आहे. असे सांगून आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेचा लेखा जोखाही त्यांनी सांगितला आहे. या वेळी तानाजी शेटे, सरपंच अरुण मातंग, कांबीचे सरपंच नितेश पारनेरे, सुनील राजपूत, सुधीर लाड, प्रशांत ढाकणे, बाळासाहेब भराट, श्रद्धा कुलकर्णी या माजी विद्यार्थ्यांसह नेवासा पं.स.चे सदस्य अजित मुरकुटे यांनी ही मुरकुटे यांचे बाबत आपले विचार व्यक्त केले असून या कार्यक्रमास शिवाजीराव पाटील, प्रा.शिंदे, प्रा. बोडखे, संपतराव दसपुते, काकासाहेब घुले, कचरू गुंदेचा, लवांडे सर, रमेश खैरे, शेरे सर, यांचेसह शेवगाव व नेवासा तालुक्यातील संस्थेच्या सर्व शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनवणे सर, श्री रोहकले सर, श्री पंडित सर, श्री दुधाडे सर, श्री कर्डिले सर, कांबी गावचे सोसायटी चेअरमन प्रशांत मडके, नंदू मस्के, रवींद्र मस्के, नातेवाईक व ग्रामस्थासह शाळेचे आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या विद्यालयांमध्ये नाईक पदावर काम केलेले शेषराव भराट तात्या हे सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला प्रास्ताविक रामदास रामावत यांनी केले असून आभार मोनिका काळे यांनी मानले आहेत.