
वाशीम प्रतिनिधी राम इढोळे
शेतकऱ्यांची सध्या बी-बियाणे, खते खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या संधीचा फायदा घेत बऱ्याच कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून फसवणूक होत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी बोगस बियाणे विक्री, मालाचा तुटवडा असल्याचे सांगून वाढीव दर आकारणे आदी प्रकार घडताना दिसून येत आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकारी संघटनेचे यूवा जिलाध्यक्ष सतिष इढोळे यांनी केली आहे.
वाशिम तालुक्याच्या ग्रामीण भागात बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन बॅग विकत घेतल्या. या बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी त्यांनी थोडेफार बियाणे घेतले. मात्र, या बियाण्याला उगवण क्षमता नसल्याकारणाने हे बियाणे सडल्याचा गंभीर प्रकार देखील तालुक्यात समोर आले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याकडे गांभीर्याने पाहून शेतकरी बांधवांची होणारी फसवणूक थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतकरी बियाणे खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर एकच गर्दी होताना दिसत आहे. मात्र, शेतकरी बांधवांच्या या गदीर्चा फायदा घेत बऱ्याच कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून बोगस बियाणे विकणे, मालाचा तुटवडा असल्याचे सांगून वाढीव दर आकारणे, हलक्या प्रतीचे बियाणे देणे आदी गंभीर प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी कृषी विभागाने पावले उचलण्याची मागणी स्वाभिमानी शेतकारी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतिष इढोळे यांनी केली आहे.