
सुखदेव गायकवाड शेवगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषद आदर्श शाळा बालमटाकळी येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्व मुलांची ट्रॅक्टर मधून सर्व गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण बँड पथक होते. देशभक्ती व शालेय गीतांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. फेरीत ग्रामस्थांचा उत्फुर्त सहभाग होता. गावातून फेरी काढताना ठीक ठिकाणी महिलांनी सर्व मुलांचे औक्षण केले. पंचायत समितीचे माजी उपसभापती रामनाथ दादा राजपुरे, भेंडा कारखान्याचे माजी संचालक मोहन बापू देशमुख, केदारेश्वर कारखान्याचे माजी संचालक हरिश्चंद्र राजे घाडगे, सरपंच डॉ राम बामदळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब सोनवणे, उपाध्यक्ष सत्तार भाई शेख, सदस्य विठ्ठल देशमुख, भारत घोरपडे तसेच गावातील संदीप बामदळे, बर्गे मामा, विकास बामदळे आदी ग्रामस्थ यांनी फेरीत सहभाग नोंदवला. शाळेतील सर्व शिक्षक यांनी शाळेचा नवीन ड्रेस कोड तयार केला. नवागत मुलांचे शाळेतील शिक्षिका अनिता हिवाळे मॅडम, प्रीतम बैरागी मॅडम, मनीषा मीसाळ मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका विजया कवडे मॅडम यांनी सर्व मुलांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व मुलांना पाठ्यपुस्तके व इतर साहित्य वाटप केले. शालेय फेरीसाठी शाळेतील शिक्षक कल्याण पोटभरे सर, रुस्तुम दौंड सर, देविदास गरकळ सर, दिगांबर गाडेकर सर. जयराम देवढे सर. किरण बैरागी सर यांनी विशेष मेहनत घेतली. पहिल्याच दिवशी सर्व मुलांना गोड जेवण देण्यात आले.मिरवणुकीसाठी श्रावण शेळके यांनी विनामूल्य ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शंतनु शेळके यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व मुले शाळेत दाखल झाले. कार्यक्रम प्रसंगी पत्रकार इसाक शेख उपस्थित होते.