Saturday, April 5, 2025
spot_img
25.9 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogआडोळी येथील पानंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल प्रतिनिधीचे दुर्लक्ष

आडोळी येथील पानंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल प्रतिनिधीचे दुर्लक्ष

वाशिम प्रतिनिधी

वाशिम वाशिम जिल्ह्यातील आडोळी गाव सर्वात मोठे असून शेतकऱ्यांच्या हितासाठी पानंद रस्ते होणे गरजेचे आहे. याबाबत अनेक दिवसापासून शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करायला हव्या होत्या व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व सुखासाठी पानांद रस्ते करणे गरजेचे आहे. याबाबत अनेक आवाज शेतकऱ्यांनी उठवले असल्याचे समजते. परंतु लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी प्रतिसाद दिला नसल्याने आज रोजी या रस्त्यावरून जाता येत नाही. या गावात जवळपास सात पानंद रस्ते आहेत, परंतु एकही पानंद रस्ता मातोश्री ग्रामसमृद्ध शेतकरी / पाणंद रस्ते योजनेतून झाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी निद्रास्त अवस्थेत असल्याची शेतकऱ्यांची भावना निर्माण झाली असून त्याची दिशाभूल होत असल्याचे ते बोलत आहेत

केवळ मतदान असते तेव्हा शेतकरी दिसतात. मात्र त्यांची दुरावस्था खुपचं वाईट झाली आहे. शेतीसाठी असलेले रस्ते या कामाकडे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे बोलतात. लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे कधी लक्ष देणार का? असा सवाल आडोळी गावामधे गावकरी करत आहेत.

लोकप्रतिनिधिनीं जर या शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष्य दिले नाही व सदर रस्ते मातोश्री ग्रामसमृद्ध शेतकरी पानांद रस्ते या योजनेमध्ये घेतले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन करेल.”

राम इढोळे – विदर्भ सचिव स्वाभिमानी शेतकरी संघटना.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular