
कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के
मागील वर्षाच्या खरीप हंगामातील विमा नुकसान भरपाई काही ठराविक शेतकऱ्यांना मिळाली तर काही शेतकऱ्यांना ती मिळाली नाही .गावातील ९० टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. ते आंदोलनाच्या तयारीत आहेत. याबाबत ॲड शिवाजीराव काकडे व सौ हर्षदाताई काकडे यांनी व शेवगाव तालुक्यातील काही ठराविक गावातील शेतकऱ्यांनी मिळुन तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले. लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा आशयाचे निवेदन दिले गेले.
आज दि २६ ॲड शिवाजीराव काकडे कांबीत आले असता कांबीतील शेतकऱ्यांनी काकडे यांच्या समोर कृषी सहायक व विमा कंपनी प्रतिनिधीचा अजब कारभार सांगितला . यावेळी ॲड शिवाजीराव काकडे साहेब यांनी आपण शेतकऱ्यांच्या सोबत कायम असल्याची भावना व्यक्त केली व शेतकरी यांची जिल्हा कृषी अधीक्षक नगर यांच्या सोबत भेट व चर्चा घडवून आणण्यासाठीचे आश्वासन दिले.
पुढील कार्यवाही झाली नाही तर आपण सर्व शेतकरी यांच्या समवेत जिल्हा कृषी कार्यालयासमोर बोबा बोंब आंदोलन छेडू असे आश्वासनही कांबी येथील शेतकऱ्यांना दिले.या वेळी कृषी सहायक गणेश पवार,माजी व्हा चेअरमन शिवाजी कुऱ्हे, रामभाऊ पवार,जनशक्ती चे अकबरभाई शेख रासपचे बाजीराव लेंडाळ,बाळासाहेब नरके, सुमित पंचारिया,डॉ रामेश्वर राजपुत, मोहन शिंदे,कचरुपाटील म्हस्के,विठ्ठल राजपुत,पप्पु कैतके, काशिनाथ चने, बाबासाहेब म्हस्के,शिराज शेख,लक्ष्मण चांडे,राजेंद्र नरके,डॉ सतिश मनचुके, संतोष घाडगे, अर्जुन म्हस्के, सोपान नलवडे, दत्तात्रय गोरे,नवनाथ बाठे,अदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते