Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogमुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल

डोमिसाईल’ऐवजी चालणार ‘हा पुरावा, उत्पन्न दाखल्यातून ‘या’ महिलांना सवलत; जमिनीची अट रद्द, अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत….

वाशिम प्रतिनिधी राम इढोळे


‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रूपयांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती. पण, आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय योजनेत पाच एकर शेतीची अट होती, ती पण आता वगळण्यात आली आहे.

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० ऐवजी आता २१ ते ६५ असा करण्यात आला आहे. परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केलेला असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेतून लाभ देण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत दोन महिने राहणार असून ३१ ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल.

३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलैपासून दरमहा १५०० रूपयांचा लाभ एकत्रित मिळेल.

या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते, पण आता त्याऐवजी १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक पुरावा चालेल

योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली असून लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्षांऐवजी २१ ते ६५ वर्षांपर्यंत करण्यात आला आहे

परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल

अडीच लाख रूपयांच्या उत्पन्नाचा दाखला नसल्यास ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली असून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular