
शेवगाव प्रतिनिधी
शेवगाव पोलिस ठाण्यात चिरीमिरी घेतल्या शिवाय कुठलेही काम होत नसून यामुळे सामान्य नागरिकांसह वकील मंडळींना सुद्धा शेवगाव पोलिसांच्या मनमानी चा सामना करावा लागत आहे, या मुळे त्रस्त झालेल्या वकील मंडळींनी शेवगाव तालुका वकील संघातर्फे मा.उपविभागीय पोलिस अधीकारी शेवगाव यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदरील निवेदनात म्हटले आहे की,शेवगाव पोलिस स्टेशनचे श्री. दिंगबर भदाने हे पोलिस इन्स्पेक्टर म्हणून नेमणुकीस आहेत, शेवगाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था संपूर्ण मोडकळीस निघालेली आहे. शेवगाव पोलिस स्टेशन येथे कोणत्याही कामामध्ये चिरीमिरी केल्याशिवाय काम होत नाही. सदरील शेवगाव पोलिस स्टेशनचे पी. आय. हे नेहमी मनमानी कामकाज करत आहेत.शेवगाव तालुका वकील संघा मधील वकील कामानिमित्त गेल्यानंतर वकीलास चांगली वागणुक दिली जात नाही.वकीलास उध्दटभाषा वापरली जाते, वकील चिरीमरीस विरोध करतात म्हणून प्रत्येकी वेळी वकीलांचा अपमान केला जातो. शेवगाव तालुक्यामध्ये दरम्यानचे काळात दोन नंबरच्या धंद्यामध्ये तसेच चोरीच्या घटना मध्ये वाढ झालेली आहे. शेवगाव पोलिस स्टेशन येथे एजंटचा सुळसुळाट आहे.
अनेक पोलिस वाळूधंद्या मध्ये सामील असून वाळू धंद्यामधील लोकांशी त्यांची पार्टनरशिप आहे.
तरी आपणास वकील संघा तर्फे कळविण्यात येते की,वरील घटनेची योग्य ती चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा शेवगाव वकील संघा ठर्फे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
निवेदनावर शेवगाव तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.आर.जी.बुधवंत, सेक्रेटरी ॲड.एस.आर.देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, निवेदन देते वेळी तालुक्यातील प्रमुख वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.