
शेवगाव प्रतिनिधी : मागील अडीच वर्षात शेवगाव तालुक्यातील राहिलेली विकासकामे झपाट्याने पूर्ण केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र येऊन महायुतीचे सरकार स्थापन केले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून शेवगाव पाथर्डी मतदार संघात कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांनी विविध विकासकामाचा सपाटा लावला आहे. आज कर्तव्यदक्ष आ. मोनिकाताईने मंजूर केलेल्या १३ कोटी ६० लाख रुपये कामाचे भूमिपूजन पार पडले.
मुंगी येथे ८ कोटी रु. खर्चाच्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. डभानवाडी ते मुंगी रस्ता सुधारणा (३ कोटी रु.), मुंगी ते कोळी वस्ती उर्वरित रस्ता सुधारणा (३ कोटी रु.), मुंगी ते कोळी वस्ती लहान पुलासह मजबुतीकरण व डांबरीकरण (२ कोटी रु.).
दहिगाव शे. येथे बाभुळगाव- गदेवाडी -मुंगी रस्त्याचे २. ५० कोटी रु. मंजूर करून भूमिपूजन व विशेष म्हणजे घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे शासनाने सुरु केलेल्या योजनेतून भीमनगर मधील समाजमंदिरासाठी १० लक्ष रुपये निधीची तरतूद करून त्याचं भूमिपूजन पर पडले.
बोधेगाव येथे १ कोटी रुपये निधीची तरतूद करून बोधेगाव – एकबुर्जी – पहिलवान वस्ती ते कळेगाव वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरणासह पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
चापडगाव – कांबी रस्त्यासाठी १ कोटी रुपये निधीची तरतूद करून भूमिपूजन करण्यात आले.
विकासकामाची सुरुवात करताना आनंद होतोय. विकासाची ही यात्रा थांबणार नाही. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण दिलेली ताकद विकासकामांमधून दाखवून देण्याची वचनपूर्ती आज माझ्याकडून होत आहे. जो विश्वास आपण माझ्यावर टाकला, त्या विश्वासातूनच माझ्या कर्तव्याप्रति समर्पित राहून विकासाच्या वाटेने मतदारसंघ घेऊन जाण्याचा प्रयत्न करतेय. तसेच विकास कामाबाबत राहिलेली आणखी काही कामे असतील तर फक्त सूचना द्या, त्याबाबत तात्काळ नोंद घेऊन मागणीची पूर्तता केली जाईल,” असे आवाहन कर्तव्यदक्ष आ. मोनिकाताई राजळे यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमप्रसंगी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची गावातील महिलांना माहिती दिली. अर्ज भरलेल्या महिला भगिनींची संख्या माहिती करून घेतली. उर्वरित महिलांनी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी राबवत असलेल्या कॅम्पमध्ये आपली नोंदणी करावी, असे आवाहन केले.
गावातील नागरिकांच्या मागण्यांना मूर्त रूप येणार असल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. या सर्वांशी बोलत आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी तालुक्यातील नागरिक, युवक, महिला-भगिनी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.