
हातगाव प्रतिनिधी रावसाहेब निकाळजे
गत वर्षी शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकांचा भरलेला जो पिक विमा आहे. त्यामध्ये जो गोंधळ झाला आहे तो शेतकरी बांधवावर अन्याय करणारा असून अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहिले असल्याने तो मिळावा म्हणून अनेक वेळा तालुका व जिल्हा पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने आता या प्रमुख मागणी साठी कांबी गावातील सर्व पक्षीय शेतकरी मंत्रालयात धडक देणार असल्याबाबतची माहिती बाजीराव लेंडाळ, बाळासाहेब नरके व सुमित पंचांरिया यांनी दिली आहे.या बाबत गावातील ज्या – ज्या शेतकऱ्यांना सन २२/२३ मधील पिक विमा मिळाला नाही. अशा सर्व शेतकऱ्यांची कांबी यथील श्री. महालक्ष्मी देवीच्या मंदिरात नुकतीच बैठक घेण्यात आली असून या बैठकीमध्ये माहिती देताना लेंडाळ, नरके व पंचांरिया सांगितले आहे की,आपल्या गावामध्ये एकूण १ हजार ३५० जमीनधारक खातेदार संख्या असून त्यामध्ये १ हजार १५० शेतकऱ्यांनी शासन निर्णया प्रमाणे सन २२/२३ मध्ये जो पिकविमा भरला आहे त्यामध्ये फक्त २९६ शेतकरी पिक विम्यास पात्र झाले असून सुमारे ६७५ शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहिले असल्याने गावाला पिक विम्याची रक्कम का कमी आली या विषयावर सविस्तर चर्चा होऊन कमी आलेल्या रक्कमेमुळे आपण अनेक वेळा तालुका व जिल्हा पातळीवरील विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषिविभागाच्या अधिकाऱ्यांनाही वेळो – वेळी समक्ष भेटून निवेदने दिली असूनही त्याची दख्खल घेतली जात नसल्याने आता आपण सर्व शेतकरी मिळून थेट मुंबई येथे जाऊन मंत्रालयात जाऊन बसू असा निर्णय झाला असून थोड्याच दिवसात रीतसर निवेदन देऊन शेकडो शेतकऱ्यांच्यासह जाण्याचा निर्णय झाला असल्याचेही या वेळी लेंडाळ, नरके व पंचांरिया यांनी म्हटले असून या वेळी सर्व पक्षीय शेकडो शेतकरी उपस्थित होते.